मुंबई

एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

हुसैन मोहम्मद युसूफ शेख आणि मोहम्मद जाफर मोहम्मद मंजूर शेख अशी या दोघांची नावे आहेत

प्रतिनिधी

मुंबई : एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी खार आणि सांताक्रुझ येथून अटक केली. हुसैन मोहम्मद युसूफ शेख आणि मोहम्मद जाफर मोहम्मद मंजूर शेख अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २०० ग्रॅम वजनाचे एमडी आणि दोन मोबाईल असा सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ऑल आऊट मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच काहीजण खार आणि सांताक्रुज परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून हुसैन शेख आणि मोहम्मद जाफर शेख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना २०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?