मुंबई

पाच कोटींच्या अपहारप्रकरणी दोघांना मध्य प्रदेशातून अटक

या दोघांनी नंतर विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

Swapnil S

मुंबई : रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग इस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डच्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी दोघांना मध्य प्रदेशातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कौशलेंद्र मधुकर देकांते आणि वीरेंद्र हरिकिशन दहिकर अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग इस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डचे अध्यक्ष असून त्यांच्या मंडळाचे मशिदबंदर येथील बँक खात्यात एक अकाऊंट आहे. तीन वर्षांपूर्वी आठ बोगस धनादेशाच्या मदतीने अज्ञात व्यक्तीने मंडळाच्या पाच कोटीचा परस्पर अपहार करून फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच मंडळाच्या वतीने अध्यक्षांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहार, फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला होता. हा तपास येताच या पथकाने मध्य प्रदेशातील रहिवाशी असलेल्या कौशलेंद्र देकाते आणि वीरेंद्र दहिकर या दोघांना अटक केली. चौकशीत बोगस धनादेशावर स्वाक्षरी करून कौशलेंद्रने दोन धनादेशावरून १ कोटी ९१ लाख तर वीरेंद्रने एका धनादेशावरुन ७१ लाख ६० हजाराची रक्कम स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

ही रक्कम या दोघांनी नंतर विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी