मुंबई

सलमानला भेटण्यासाठी खटाटोप अंगलट, फार्म हाऊसमध्ये तारा तोडून घुसण्याचा प्रयत्न केला अन्...

पनवेलमधील वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना...

Swapnil S

नवी मुंबई : पनवेलमधील वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना तेथील सुरक्षारक्षकांनी पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या दोघा तरुणांजवळ बनावट आधार कार्ड सापडल्याने पनवेल तालुका पोलिसांनी या दोन्ही तरुणांविरोधात फार्महाऊसमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करणे तसेच बनावट आधार कार्ड तयार करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये अजेशकुमार ओमप्रकाश गिला (२३) व गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख (२३) या दोघांचा समावेश असून हे दोघेही मूळचे पंजाब राज्यातील आहेत. गुरूवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास या दोघांनी पनवेलमधील वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये ताराच्या व झाडाच्या कंम्पाऊंडमधून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी या दोघांना पकडले. दोघांनी आपली खोटी नावे महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राध्येशाम असल्याचे तसेच ते उत्तरप्रदेश राज्यातील असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे फार्महाऊसवर येण्याचे कारण विचारले असता, त्यांनी काहीएक उत्तर न दिल्याने सुरक्षारक्षकांनी पनवेल तालुका पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपली नावे खरी नावे अजेशकुमार ओमप्रकाश गिला व गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केल्यावर दोघांनी आपल्या फोटोचा वापर करुन खोट्या नावाने आधारकार्ड बनविल्याचे आढळून आले. "प्राथमिकदृष्ट्या, सलमान खान आत असल्याचे कळताच त्यांनी फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सलमानला भेटायचे होते, असे त्यांनी चौकशीत सांगितले आहे. आम्ही त्यांना अटक केली आहे." असे नवीन पनवेल पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक