मुंबई

Uddhav Thackeray on Andheri by poll win : मशाल भडकली आणि... ; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri by poll) पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला. यावर उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

प्रतिनिधी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला. सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाची मशाल चिन्हावर ही पहिलीच निवडणूक होती. या विजयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की, "कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे." विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” या निवडणुकीमध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. यावर त्यांनी म्हंटले की, "आमचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. ज्यांच्या मागणीवरुन गोठवले ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मते त्यांना मिळाली असती. नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव