देशात युवाशक्तीपेक्षा बुवाशक्ती जास्त माजली आहे; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका X | @ShivSenaUBT_
मुंबई

देशात युवाशक्तीपेक्षा बुवाशक्ती जास्त माजली आहे; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका

आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती जास्त माजली आहे. देशाचे भविष्य युवक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देश पुढे जाऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केली.

Swapnil S

मुंबई : आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती जास्त माजली आहे. देशाचे भविष्य युवक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देश पुढे जाऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडी चुहा’ म्हटले होते. त्यामुळे आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक आहे? असा सवालही त्यांनी केला. सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकी आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या ‘मार्मिक प्रकाशनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ या दोन पुस्तकांचे तसेच व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संपादन केलेल्या ‘ज्वलंत रेषा बाळ केशव ठाकरे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडले. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर आदी मान्यवर उपस्थित होते. “माणसाने धर्माला जन्म दिला आहे, धर्माने माणसाला नाही,” असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांची भाषा ही ‘त्या’ काळाची गरज

राजकारणात आल्यानंतर बाळासाहेबांसारखी भाषा का वापरत नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जात असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिल्पकाराचे उदाहरण दिले. “माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी समाजरूपी मूर्ती घडवण्यासाठी हातोडा आणि छिन्नी वापरली. आज ती मूर्ती घडली आहे. आता तिची पूजा करण्याची वेळ आहे,” असे ते म्हणाले.

वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

मुंबईत पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील विक्रम मोडणार

दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; मेट्रो स्थानकांमध्ये शिरलं पाणी, रस्तेही जलमय

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा