मुंबई

महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही, उद्धव ठाकरे यांचा ओपन जिपमधून आव्हान

1969 मध्ये बाळासाहेबांनी गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

प्रतिनिधी

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही काढून टाकले आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव गटाची बैठक सुरू आहे. आमदार-खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
महाशिवरात्रीच्या दिवशी आमचे धनुष्यबाण चोरीला गेले. ज्यांनी धनुष्यबाण चोरले त्यांनी मधमाशांच्या पोळ्या वर दगड मारला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांना बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे पण ठाकरे कुटुंबाचा नाही. पुन्हा भगवा फडकल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग हा मोदींचा गुलाम आहे. मी थकलो नाही, मी खचणार नाही. शिवसेना संपवता येणार नाही. हे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचा वापर केला आहे. 1969 मध्ये बाळासाहेबांनी गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे