उद्धव ठाकरे एक्स
मुंबई

अखेरचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन; मुंबई पालिका काबीज करण्यासाठी ठाकरे ‘अक्शन मोड’मध्ये गटनेते, शाखाप्रमुख २२७ प्रभाग पिंजून काढणार

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्याचे स्वप्न भंगल्यानंतर शिवसेनेचा अखेरचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

गिरीश चित्रे

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्याचे स्वप्न भंगल्यानंतर शिवसेनेचा अखेरचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

गटप्रमुख, शाखाप्रमुख मुंबईतील २२७ प्रभाग पिंजून काढणार आहेत. मूळच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदेसेनेत गेले असले तरी ठाकरेंसोबत असलेल्या माजी नगरसेवकांसह नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री येथे बैठक बोलावण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना भावनिक साद घातली.

मुंबई महापालिकेचे २५ वॉर्ड असून या अंतर्गत २२७ प्रभाग येतात. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत २२७ प्रभागात हिंदुत्वाचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मतदारांच्या काय अपेक्षा, मतदारांचा कौल काय या सगळ्यांचा आढावा घेण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिले आहेत.

गेल्या २५ दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना दोन मित्रपक्ष राजकीय शत्रू झालेत. त्यानंतर भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेत नेहमीच खटके उडत आले आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि भाजपबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली.

गेली अडीच वर्षे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी महायुती सत्तेत होती. महायुती सत्तेत असताना लोकसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने पसंती दिली. मात्र भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यात मविआला अपयश आले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा मविआच्या नेत्यांनी केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि मविआला जोरदार धक्का बसला. यात विशेष करून राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ नये आणि मुंबई महापालिका हा अखेरचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

राज्यव्यापी मेळावे घेणार 

आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षबांधणी करण्यात येणार आहे. यात मुंबईतील २२७ प्रभागातील गट नेत्यांचे मेळावे, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आदींचे राज्यव्यापी मेळावे घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आयोजित बैठकीत माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सांगितले.

स्वबळावर लढण्याची चाचपणी 

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कट्टर शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा नारा दिला आहे. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणूक मविआ म्हणून एकत्रित लढलो आहोत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची का, याबाबत शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्षबांधणीवर भर 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरी अपयश आले. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने पक्षबांधणीवर भर दिला आहे. पदाधिकाऱ्यांना योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. गटनेते, शाखाप्रमुख यांनी जातीने प्रभागात लक्ष घालावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

- विनायक राऊत, नेते, शिवसेना (ठाकरे गट)

कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - सुप्रीम कोर्ट; हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार

अमेरिकेच्या भूमीवरून मुनीर यांनी ओकली गरळ; भारताला अणुहल्ल्याची धमकी

ही पाकिस्तानची जुनीच खोड! अणुहल्ल्याच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी; महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

महायुतीत पुन्हा कलगीतुरा रंगणार? नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे करणार ध्वजारोहण