अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri By Election result) आज निकाल जाहिर झाला. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या. त्यांना ५३,४७१ मतांनी विजयी झाल्या. ही निवडणूक एकतर्फी असतानादेखील जेमतेम ३१.७४ टक्के झाले होते. नोटा या बटनाला ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ सर्वात जास्त मतदारांनी पसंती दिली. नोटाला तब्बल १२,८०६ लोकांनी पसंती दिली.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Rutuja Latake) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले. तर भाजपने मागच्या २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना तिकीट देत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
परंतु अखेरच्या क्षणी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण म्हणून निवडणुकीतून त्यांचा अर्ज मागे घेतला व ही निवडणूक एकतर्फी झाली. या निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय हा निश्चितच मानला जात होता. या निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात मागील १५ वर्षाच्या तुलनेत सर्वात निच्चांकी म्हणजे ३१.७४ टक्के मतदान झाले.