मुंबई

चर्नीरोड स्टेशन येथील अनधिकृत झोपड्या केल्या जमीनदोस्त

प्रतिनिधी

चर्नीरोड स्टेशन (पूर्व) परिसरात अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या अडथळा ठरणाऱ्या ३२ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या डी वॉर्डाच्या ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे.

चर्नीरोड स्टेशन (पूर्व) नजिक असणा-या महर्षी कर्वे मार्गावर गेल्या काही आठवड्यांमध्ये सुमारे ३२ अनधिकृत झोपड्या उद्भवल्या होत्या. पदपथांवर व पदपथानजिक या झोपड्यांमुळे पादचा-यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. ज्यामुळे, अनेक पादचारी हे पदपथा नजिकच्या रस्त्यावर चालत असल्याने अपघाताची संभाव्यता वाढण्यासोबतच वाहतुकीला देखील अडथळा येत होता. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्याही संदर्भाने आणि परिमंडळ १च्या उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनानुसार महानगर-पालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान या ३२ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ८० कामगार - कर्मचारी-अधिकारी यांची चमू घटनास्थळी कार्यरत होती. त्याचबरोबर मोठ्या आकारातील पाईप उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा मशिन देखील या कारवाईसाठी वापरण्यात आले, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?