मुंबई

कारने फरफटत नेल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

कारने फरफटत नेल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे.

Swapnil S

Mumbai : कारने फरफटत नेल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपघाताची नोंद करून आरोपी कारचालक रिहान निजामुद्दीन कुडाळकर याला अटक केली आहे.

हा अपघात सोमवारी रात्री उशिरा सव्वाच्या सुमारास चेंबूर येथील व्ही. टी पाटील मार्ग, अमर सिनेमागृहाजवळ झाला. रिहान हा मानखुर्द येथे राहत असून त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या कुटुंबियांसोबत अमर सिनेमागृहाजवळ जेवणासाठी आला होता. जेवणानंतर ते जात असताना त्याच्या कारची एका व्यक्तीला धडक लागली. या कारने त्याला काही अंतर फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या या व्यक्तीला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य