मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांना मोठे यश; बिझनेस इन्क्युबेटर स्थापनेस केंद्राची मंजुरी संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांना मोठे यश; बिझनेस इन्क्युबेटर स्थापनेस केंद्राची मंजुरी

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी समाजातील युवक-युवतींमध्ये तंत्रज्ञानाधारित उद्योजकता विकसित करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.

Swapnil S

मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी समाजातील युवक-युवतींमध्ये तंत्रज्ञानाधारित उद्योजकता विकसित करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे ठाणे उपपरिसरात ‘निधी इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर’ स्थापनेस केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.

मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावाला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मंजुरी दिली आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी उद्योजकतेला चालना देण्यात येणार आहे.

ठाणे तसेच परिसरातील जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या असून, या समाजातील युवकांना तंत्रज्ञानाधारित उद्योग उभारण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग