मुंबई

महामार्गावरील बेशिस्त वाहन चालकांना आता आळा बसणार

प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच मद्यपान करून वाहन चालविणे यामुळे राज्यातील महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पंधरा टक्क्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांना रोखण्यासाठी राज्यातील महामार्गांवर विशेषतः मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग आणि पुणे-कोल्हापूर या महामार्गावरील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

वाढत्या अपघातांची आकडेवारी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणार्यां वाहन चालकांच्या विरोधात महामार्ग पोलिस, परिवहन विभाग व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात कराव, असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.

मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते. या वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात होतात त्यामुळे वाहतूक ठप्प होते. पर्यायाने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतो. त्याचबरोबर प्रवासाला विनाकारण विलंब होतो. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शंभूराजे देसाई यांनी यावेळी दिले.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?