उस्ताद झाकीर हुसेन  
मुंबई

उस्ताद झाकिर हुसेन विशेष संगीत मैफील; एनसीपीएमध्ये आजपासून कलाकार सहभागी होणार

जागतिक स्तरावर भारतीय संगीताची पताका उंचावणारे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त 'मेस्ट्रो फॉरएव्हर-ए ट्रिब्यूट टू झाकिर हुसेन' ही दोन दिवसांची श्रद्धांजलीपर विशेष संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे. १४ आणि १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत एनसीपीएमध्ये ही श्रद्धांजलीपर मैफील रंगणार आहे.

Swapnil S

मुंबई : जागतिक स्तरावर भारतीय संगीताची पताका उंचावणारे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त 'मेस्ट्रो फॉरएव्हर-ए ट्रिब्यूट टू झाकिर हुसेन' ही दोन दिवसांची श्रद्धांजलीपर विशेष संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे. १४ आणि १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत एनसीपीएमध्ये ही श्रद्धांजलीपर मैफील रंगणार आहे.

एनसीपीएतर्फे आयोजित या संगीत मैफलीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक मुंबईक-रांना त्याचा आनंद घेता येईल.

बोरिवली (पश्चिम) स्थित प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह, दादर (पश्चिम) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या तीन ठिकाणी दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

तबला वादनातील मेरुमणी उस्ताद झाकिर हुसेन यांचे गत वर्षी दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापासून रॉक, पॉप, जॅझ, फ्यूजन आणि वर्ल्ड म्युझिकपर्यंत सर्व शैली आत्मसात असणारा त्यांचा दूरदृष्टिपूर्ण संगीतप्रवास आजही जगभरातील संगीतकारांसाठी प्रेरणादायी आहे. 'मेस्ट्रो फॉरएव्हर'मध्ये प्रेक्षकांना विविध माध्यमांतून उस्ताद झाकिर हुसेन यांचा विलक्षण प्रवास अनुभवता येणार आहे. त्यात संगीत मैफिली, चर्चासत्रे व संवाद असेल.

मुंबईच्या सुपूत्राला श्रद्धांजली

मुंबईचे सुपूत्र असलेले उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात भारतासह जगभरातील ५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांपैकी अनेकांनी झाकिर हुसेन यांच्यासोबत सांगितिक सादरीकरण केले असून, त्यांच्याशी वैयक्तिक, कलात्मक आणि भावनिक नाते जपले आहे. त्यामध्ये जॉन मॅक्लॉफ्लिन, लुईस बँक्स, डेव्ह लॅण्ड, गणेश राजगोपालन, रणजीत बारोट, व्ही. सेल्वगणेश, शंकर महादेवन, क्रिस पॉटर, संजय दिवेचा, गिनो बँक्स, अजय चक्रवर्ती, अमजद अली खान, राकेश चौरसिया यांसह अनेक प्रतिष्ठित संगीतकारांचा समावेश आहे.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?