मुंबई

इकडे आड, तिकडे विहीर! रस्त्यात विहीर आडवी आली, पण कोणी नाही पाहिली; वाकोला येथील सीसी रस्त्याचे काम थांबले

'डीपी' रोडची सुधारणा करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. वाकोला येथे 'सीसी' रस्त्याचे अर्धे काम जवळपास पूर्ण होत असताना मधोमध ६० वर्षे जुनी विहीर असल्याने पालिकेची कोंडी झाली आहे. विहीर बुजवणे नियमात बसत नाही आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडणे शक्य नाही. त्यामुळे 'रस्त्यात विहीर आडवी आली, पण कोणी नाही पाहिली', अशी अवस्था पालिकेची झाली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : 'डीपी' रोडची सुधारणा करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. वाकोला येथे 'सीसी' रस्त्याचे अर्धे काम जवळपास पूर्ण होत असताना मधोमध ६० वर्षे जुनी विहीर असल्याने पालिकेची कोंडी झाली आहे. विहीर बुजवणे नियमात बसत नाही आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडणे शक्य नाही. त्यामुळे 'रस्त्यात विहीर आडवी आली, पण कोणी नाही पाहिली', अशी अवस्था पालिकेची झाली आहे.

खड्डेमुक्त मुंबईसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाकोला येथील 'डीपी' रोडची सुधारणा करण्यासाठी सीसी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रस्त्याला लागूनच जुनी विहीर असल्याचे काम सुरू असताना निदर्शनास आले. विहीर बुजवायची की, त्यावर लोखंडी मजबूत ग्रील बसवायची याबाबत पालिकेचा पर्यावरण, कीटकनाशक विभाग व रस्ते विभाग विचार करत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रभाग क्र. ८८ मधील खांडवाला कंपाऊंड, वाकोला पाईपलाईन ते रुपवाल अपार्टमेंट या रस्त्यावर ६० वर्षे जुनी विहीर असून या विहिरीला झरा नसल्यामुळे ती वापरात नाही. त्यामुळे स्थानिक तिचा वापर कचरा टाकण्यासाठी करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्यास

घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रहिवाशांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता ४० फूट 'डीपी' रोड रुंद असून सध्या पालिकेच्यावतीने येथे बॉक्स ड्रेनसह सिमेंट काँक्रीटचे काम करत आहे. मात्र, या कामात विहीर आडवी आल्याने रस्त्याचे काम रखडले आहे, असा आरोप ठाकरे सेनेच्या नगरसेविका श्रवरी परब यांनी केला आहे.

...अन्यथा पुढील कार्यवाही करणार!

'डीपी' रोडची सुधारणा करण्यासाठी वाकोला पाईप लाईन ते रुपवाला अपार्टमेंट दरम्यान 'सीसी' रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम करताना रस्त्याला लागून विहीर असल्याचे आढळले. याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी रस्ता व विहीर यावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांची वेळ मागितली आहे. दोन महिन्यांत तोडगा काढला नाही, तर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा श्रवरी परब यांनी दिला आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी