संग्रहित छायाचित्र पीटीआय
मुंबई

अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती

आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे

Swapnil S

मुंबई : हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी शनिवारी दिली.

वांद्रे येथे माध्यमांशी संवाद साधताना शेलार बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपायला हवे, असे मला वाटते. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. मात्र महायुती म्हणून सगळ्यांनी एक राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल, असे शेलार म्हणाले.

नवाब मलिकांना भाजपचा विरोधच

नवाब मलिकांना आमचा विरोध आहे. त्यांना तिकिट द्यावे की नाही, याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील. परंतु, दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिका ठाम असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी