मुंबई

मुंबईत पावसाळी आजारांचे टेन्शन वाढणार? २५ हजार ठिकाणी डेंग्यू, अडीच हजार ठिकाणी मलेरियाच्या अळ्या आढळल्या

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू आदी साथीचे आजार पावसाळ्यात उद्भवतात. यंदाच्या वर्षी साथीचे आजार पावसाळ्यात पसरू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून झाडाझडतीला सुरुवात केली आहे

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने डासांची उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला. यात जानेवारी ते आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल २४ हजार ७४२ ठिकाणी डेंग्यूच्या एडीस, तर २ हजार ४५९ ठिकाणी मलेरियाचे ‘अ‍ॅनोफिलीस’ डास आढळले. डेंग्यू, मलेरिया निर्माण करणारी ठिकाणे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने नष्ट केली. शिवाय विविध संस्थांच्या परिसरात २२ हजार ५६८ पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्यात आल्या असून, ६ हजार ४५१ टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना बाकी असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून नष्ट होईल.

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू आदी साथीचे आजार पावसाळ्यात उद्भवतात. यंदाच्या वर्षी साथीचे आजार पावसाळ्यात पसरू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून झाडाझडतीला सुरुवात केली आहे. पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू असून, आज पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी कीटकनाशक विभागाकडून सुरू असलेल्या डास प्रतिबंधक कामाचा आढावा घेतला.

विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच विभाग पातळीवर विविध यंत्रणांनी सक्रियपणे सहभागी होत महानगरपालिकेसोबत डास उत्पत्ती स्थानांची संयुक्त शोधमोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यावेळी दिले. कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी सादरीकरण करून डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

२०३० पर्यंत मलेरियामुक्तीचे उद्दिष्ट

g मुंबईत शासकीय, निमशासकरी अशा प्रकारच्या सुमारे ६७ आस्थापना, संस्था आहेत. या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांची वाढ होऊन आजार वाढण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून या टाक्यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक कारवाई करण्यात आली.

g विभागीय पातळीवर व्हॉट‌्सअ‍ॅप ग्रुप तयार करून विभागातील संबंधित यंत्रणांना सहभागी करून संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. दरम्यान, शाश्वत विकास ध्येय ३.३ अंतर्गत २०३० पर्यंत मलेरियामुक्त असे अभियान देशपातळीवर राबवण्यात येत आहे.

'अशी' घ्या काळजी

  • पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाॅइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात.

  • त्यामुळे हे पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी