मुंबई

महिलेला मारहाण प्रकरण : तिघांविरोधात गुन्हा दाखल

महिलेने पोलिसात फिर्याद दिली, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी

मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती बॅनर मंडप उभारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर नागपाडा पोलिसांनी मनसे विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ या तिघांना ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती मंडप उभारण्याच्या कारणावरून मनसेचे उपविभागीय प्रमुख विनोद अरगिले यांनी एका महिलेला मारहाण केली होती. या प्रकरणी महिलेने पोलिसात फिर्याद दिली, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नागपाडा पोलिसांनी या तिघांविरुद्ध कलम ३२३, ३३७, ५०६, ५०४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. 

काय आहे नेमकं प्रकरण?

प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब लावण्यात येत होते. मनसे पदाधिकारी विनोद अरगिले आणि इतर सहकारी यावेळेस उपस्थित होते. प्रकाश देवी यांच्या मेडिकल समोर बॅनर लावण्यात येत असताना पीडितेने या गोष्टीस विरोध करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेले खांब काढण्याची मागणी केली. त्यावरून वाद वाढला. यानंतर मनसे पदाधिकार्यांने महिलेच्या कानशिलात लगावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे असे समजते की, यामध्ये महिला दोनदा खाली पडली. मनसेचे मुंबादेवीचे पदाधिकारी विनोद अरगिले यांनी पीडितेला कानशिलात मारल्याचे चित्र आहे. वाद सुरु झाल्यानंतर काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर मोठी गर्दी झाली व परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी