मुंबई

कार विक्रीतून महिलेची फसवणूक; ठगाला अटक

सोशल मिडीयावर कार विक्रीची जाहिरात दिसली

नवशक्ती Web Desk

मुंबई : स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला चोरीची कार विक्री करुन तिच्याकडून घेतलेल्या सात लाखांचा अपहारप्रकरणी एका ठगाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. टिगन आयरीस अल्वारीस असे या ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेला सोशल मिडीयावर एका कार विक्रीची जाहिरात दिसली होती. ही कार पसंद पडल्याने तिने ती कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून टिगनशी कार खरेदी-विक्रीबाबत चर्चा केली होती. त्याने तिला स्वस्तात कार देण्याचे आश्‍वासन देऊन तिच्याकडून कारसाठी सात लाख रुपये घेतले होते. ही कार पालसिंग नावाच्या व्यक्तीची असून, त्याने त्यांच्याकडून ही कार खरेदी केली होती, असे सांगितले होते. पेमेंट झाल्यानंतर त्याने तिला कार दिली; मात्र कारचे कागदपत्रे आणि कार तिच्या नावावर करून देण्यास तो टाळाटाळ करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने पोलिसांत तक्रार केली होती.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास