मुंबई

विक्रोळीत अपघातात महिलेचा मृत्यू; चालकाचे घटनास्थळाहून पलायन

विक्रोळीतील जेव्हीएलआर जंक्शन, उत्तर वाहिनीवर हा अपघात सोमवारी दुपारी दोन वाजता झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : विक्रोळीतील रस्ते अपघातात एका ४२ वर्षांच्या मतिमंद महिलेचा मृत्यू झाला आहे. सुप्रिया चंद्रकांत सुतार असे या मृत महिलेचे नाव असून अपघातानंतर आरोपी चालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

विक्रोळीतील जेव्हीएलआर जंक्शन, उत्तर वाहिनीवर हा अपघात सोमवारी दुपारी दोन वाजता झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धेश चंद्रकांत सुतार हा भांडुप येथे राहत असून प्रापॅटी मॅनेजर म्हणून काम करतो. मृत सुप्रिया ही त्याची बहिण असून ती मतिमंद आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकदा सुप्रिया ही कोणालाही काहीही न सांगता रस्त्यावर फिरत असते. सोमवारी ती दुपारी घरातून निघाली. जेव्हीएलआर जंक्शनजवळील उत्तर वाहिनीवरून जात असताना तिला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला सावकर आणि नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी सिद्धेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. अपघातानंतर चालक पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण