मुंबई

पतीच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेचा इशारा

लवकर न्याय मिळाला नाही, तर न्यायालयापुढे आत्मदहन करून स्वत:ला संपवून या प्रकरणात कायमचा पडदा पडण्याचा इशारा सीमा यांनी दिला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतरही पती मनमानी करत असल्याने आता न्यायालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा सीमा जाधव ( नाव बदलले आहे ) या महिलेने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी दिला आहे. माझे पती न्यायालयात हेड बेलीफ पदावर नोकरीला आहेत. माझे लग्न २५ ऑक्टोबर १९९८ साली झाले. १७ वर्षांपासून पनवेल येथील आशियाना सोसाइटी मध्ये मी रहात आहे. माझा नवरा सुरेश जाधव ( नाव बदलले आहे) याला मी एका बारबाले सोबत रंगेहाथ पकडले असता, मला मारहाण करून दोन लहान मुलांना घेऊन त्याने घरातून पोबारा केला. अशी माहिती सीमा जाधव यांनी यावेळी दिली. मी पोलीस तक्रारही केली पण पती पनवेल न्यायालयात बेलीफ पदावर काम करीत असल्याने त्याला साधी अटकही झाली नाही. मग न्यायालयात केस गेल्यानंतर न्यायालयाने पोटगी मंजूर केली, पण नवऱ्याने ते देणेही टाळले. तेव्हापासून माझ्या न्यायालयात फेऱ्या सुरू आहेत. वकील माघार घेत आहेत. कागदपत्र ही गहाळ होत आहेत. अनेक वकील बदलले गेले. अनेक पुरावे असतानाही मला न्याय मिळत नाही, असे सीमा जाधव यांनी यावेळी सांगितले.  लवकर न्याय मिळाला नाही, तर न्यायालयापुढे आत्मदहन करून स्वत:ला संपवून या प्रकरणात कायमचा पडदा पडण्याचा इशारा सीमा यांनी दिला आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत