मुंबई

भाजपच्या विजयात महिलांचा मोठा वाटा -अजित पवार

Swapnil S

मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपने जे दणदणीत यश मिळवले आहे, त्यात महिलांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून बोलत होते. आगामी काळात संसदेत तसेच विधानसभेत मोठ्या प्रमाणात महिला असतील, अशी आशादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. हा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सहभागी झालेल्या महिलांनी अजित पवार भविष्यातील मुख्यमंत्री असा संदेश असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरविण्यात मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार स्वीकारावी लागली होती. नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका संपन्न होऊन ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर झाले होते.

अजित पवार म्हणाले की, “आम्ही महाराष्ट्रातील घडामोडीनुसार अजेंडा तयार केला असून त्यानुसार निवडणुकीची तयारी करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा आदर केला असून त्यांची प्रतिष्ठा व मानसन्मान राखला आहे.” सध्या महाराष्ट्रात भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार एनसीपी यांचे सरकार सत्तेत आहे. पवार म्हणाले की, “आपला राष्ट्रवादी पक्ष समाजातील सर्व स्तरांचा विकास आणि प्रगती घडवून आणण्यास बांधील आहे.”

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस