मुंबई

पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करा -डॉ. नीलम गोऱ्हे

Swapnil S

मुंबई : कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात ५०% सवलत, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय यांसारख्या योजना महिलांसाठी सरकारकडून राबविण्यात येत असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

मलबार हिल येथील नंदनवन येथे शनिवारी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवदुर्गा महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी आमदार यामिनी जाधव, शिवसेना उपनेत्या संध्या वाढावकर, कला शिंदे, दक्षिण मुंबई संपर्क प्रमुख ममता पालव, नीलम पवार, श्रद्धा हुले, प्रिया राणे, हंसा मारू यांसह दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, शिवडी, मलबार हिल, वरळी, मुंबादेवी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघातील महिला शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या आशाताई मामीडी व सुशीबेन शाह यांनी केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त