मुंबई

मुंबईत घातपात घडविण्याचा आणखीन एक निनावी कॉल

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई शहरात घातपात घडविण्याच्या आणखीन एका निनावी कॉलमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएस अधिकारी संमातर तपास करत आहेत. दरम्यान, या कॉलननंतर पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने गुजरातमध्ये समा नावाची एक महिला राहत असून ती आसिफ नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आहै. आसिफ हा काश्मिरमध्ये राहत असून तो त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून मुंबई शहरात २६/११ सारखा अतिरेकी हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत. आसिफच्या संपर्कात काही काश्मिरी अतिरेकी असून त्यांच्या मदतीने तो हा हल्ला घडवून आणणार आहे.

विशेष म्हणजे या व्यक्तीने एटीएसचे अधिकारी समा आणि आसिफ यांना ओळखत असून त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत. या व्वक्तीने संबंधित संशयित अतिरेकी दाऊद इब्राहिमशी संबंध असून त्याच्याच सांगण्यावरुन शहरात घातपात घडविण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी आलेल्या या निनावी कॉलची मुंबई पोलिसांी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेसह एटीएसला तपासाचे आदेश दिले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चालू वर्षांत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला घातपात घडविण्याचे सुमारे ५० हून अधिक कॉल आले असून कॉल करणार्‍या बहुतांश आरोपींना पोलिसांी अटक केली आहे. थट्टामस्करीतून त्यांनी ते कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस