मुंबई

वांद्रे येथे तरुणीचा विनयभंग करून पोलिसांना मारहाण; सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला अटक

वांद्रे येथे तरुणीचा विनयभंगप्रकरणी कारवाई केलेल्या आरोपीने दोन पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी बाबर रेहमत खान या सुरक्षारक्षक आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई: वांद्रे येथे तरुणीचा विनयभंगप्रकरणी कारवाई केलेल्या आरोपीने दोन पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी बाबर रेहमत खान या सुरक्षारक्षक आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणी सांताक्रुझ येथे राहत असून तिचा स्वत:चा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री आठ वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत रिक्लमेशन गार्डनमध्ये आली होती. यावेळी बाबर खान या सुरक्षारक्षकाने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तिचा पाठलाग करुन मोबाईलवरून व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. क्षुल्लक वादातून तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या पोलीस हवालदार सुंडकर आणि पोलीस शिपाई गोराडे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन दुखापत केली तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश