संग्रहित फोटो  Canva
मुंबई

अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंग पाठविणाऱ्या तरुणाला अटक

एका ३० वर्षीय महिलेला अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून तिचा छळ केल्याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी ३६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : एका ३० वर्षीय महिलेला अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून तिचा छळ केल्याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी ३६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद अझीझ मोहम्मद निसार खान असे आरोपीचे नाव असून, तो बेहरामपाडा (वांद्रे-पूर्व) परिसरात पराठ्याचे दुकान चालवतो व तेथेच राहतो.

त्याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान याने मुंबईतील २५ महिलांचा छळ करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली आणि न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे दोन मुले असून त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशात राहते.

वांद्रे येथील एका ३० वर्षीय गृहिणीला १४ जून रोजी एका अनोळखी नंबरवरून फोन आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने अश्लील शेरेबाजी केल्यानंतर तिला अश्लील मजकूर असलेली ऑडिओ क्लिप पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर निर्मलनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास