राष्ट्रीय

अमेरिकेत महागाई नियंत्रणासाठी व्याजदरात०.७५ टक्क्यानी वाढ

या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्स २२० अंकांपेक्षा अधिक घसरला, तो ३०,५००अंकांवर आला.

वृत्तसंस्था

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने जंगली महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर ०.७५ टक्क्यानी वाढवण्याची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्या वाढीनंतर बँकेचा बेंचमार्क फंड रेट ३ टक्क्यांवरून ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२३ पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतासह संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्स २२० अंकांपेक्षा अधिक घसरला, तो ३०,५००अंकांवर आला.

महागाई नियंत्रित करण्यासाठी फेडाचाव्याजदर वाढवण्याचा निर्णय

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर ०.७५ टक्क्यानी वाढवण्याची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्या वाढीनंतर बँकेचा बेंचमार्क फंड रेट ३ टक्क्यांवरून ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२३ पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतासह संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आणि बाजार दिवसभराच्या खालच्या पातळीवर बंद झाला. डाऊ जोन्स ५२२ अंकांनी घसरून ३०१८४ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे,नॅसडॅक २०५ अंकांनी घसरला आणि ११,२२० अंकांवर बंद झाला. एस ॲण्ड पी देखील दोन टक्क्यांनी खाली आला.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

नंदूरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण; गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

कांदिवलीत गॅस गळतीमुळे भीषण आग; सात जण जखमी

जहाजबांधणी, सागरी उद्योगांसाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय