राष्ट्रीय

रशियातील घटनेने खळबळ;शाळेतील गोळीबारात १५ ठार

वृत्तसंस्था

रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी बंदूकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य २४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश असून शाळेतील दोन शिक्षक आणि दोन सुरक्षारक्षकांचाही मृत्यू झाला. शाळेचाच माजी विद्यार्थी असलेल्या बंदुकधाऱ्याने नंतर गोळी झाडून स्वत:ला संपवले.

वर्गात सर्वत्र रक्त सांडले असून शाळेच्या भिंतीवरही गोळ्या झाडल्याच्या खूणा स्पष्टपणे दिसत आहेत. आर्तेम कझानसेव असे या हल्लेखोराचे नाव असून हल्ला करण्यामागे त्याचा नेमका हेतू कोणता होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाच्या शोधपथकाकडून त्याच्या निवासस्थानाचा शोध घेतला जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या घटनेचा निषेध केला असून शोक व्यक्त केला आहे.

सध्या पोलीस संरक्षणात मुलांना शाळेतून घरी पाठवले जात आहे. जखमी झालेल्या २४ जणांमध्ये बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

ईशा अंबानी, नताशा पुनावाला ते आलिया भट्ट ; 'मेट गाला २०२४' ला 'या' भारतीयांनी लावली हजेरी!