प्रातिनिधिक फोटो  
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये स्फोटात ‘एसटीएफ’चे २ जवान शहीद

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात विशेष कृती दलाचे (एसटीएफ) दोन जवान शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले.

Swapnil S

विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात विशेष कृती दलाचे (एसटीएफ) दोन जवान शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी दु:ख व्यक्त केले असून, या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितले. नक्षलवादाविरुद्धचा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. विजापूर-दंतेवाडा-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवरून संयुक्त दलाचे पथक परतत असताना बुधवारी रात्री तारेम परिसरात बुधवारी हा स्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये विशेष कृती दलाचे दोन कॉन्स्टेबल भरत साहू आणि सत्यारसिंह कांगे हे शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी अधिक कुमक पाठविण्यात आली आहे.

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू