रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ही नोट चलनातून बाद करण्यात येणार आहे. सध्या ही नोट चलनात असणार आहे. मात्र, 30 सप्टेंबर पर्यंत 2 हजाराच्या नोटा या बॅंकेत जमा कराव्या लागणार आहेत. त्यानंतर या नोटात चलनात स्विकारल्या जाणार नाहीत. या नोटांची छपाई देखील बंद करण्यात आली आहे. 2016 मध्ये हजार आणि 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2 हजारची नोट चलणात आली होती.