राष्ट्रीय

स्मार्टफोन बाजारपेठेसाठी २०२४ उत्तम वर्ष

Swapnil S

नवी दिल्ली : २०२४ साली स्मार्टफोन उद्योगासाठी भरभराटीचे असेल असे भाकीत शाओमी इंडिया कंपनीचे अध्यक्ष मुरलीकृष्णन बी. यांनी बुधवारी सांगितले. भारताचा आर्थिक विकासदर, ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि ५जी उपकरणांमुळे मिळणारी उभारी यांचा सारासार विचार करून त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, भारतीय बाजारपेठ बहुरंगी आहे प्रत्येक किमतीस ५जी संधी देण्याची येथे संधी आहे. २०२४ सालात आपण अत्यंत व्यापक संदर्भातसह प्रवेश करीत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकिसत पावणारी अर्थव्यवस्था आहे. येथील ग्राहकांचा उत्साह देखील वाढता आहे. यामुळे २०२४-२५ सालाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास खूपच सकारात्मक चित्र दिसत आहे. कंपन्यांसाठी ही परिस्थिती ग्राहकांकडून खर्च करवून घेण्यासारखी आहे. भारतातील मध्यमवर्गाकडे खर्च करण्याची प्रचंड क्षमता आहे. भारतात हा मध्यमवर्ग वाढतच जाणार आहे. यामुळे उत्पादकता वाढवण्यास प्रचंड वाव आहे. तंत्रज्ञान सुधारणयास आणि नवनवे उत्पादन बाजारात आणण्यास खूप संधी आहेत. यामुळे स्मार्टफोन उत्पादकसारख्या कंपन्यांना येथे खूप आशा आहेत. २०२२ साल खूप आव्हानात्मक होते. त्यानंतरचे २०२३ साल देखील फारसे बरे नव्हते. मात्र २०२४ साल हे खूप चांगले असेल असे जवळजवळ प्रत्येक विश्लेषक सांगत आहे. या वर्षी एक अंकी वाढ होईल. पण बाजार विस्तारेल. कारण ५जी उपकरणे बाजारवाढीला इंधन पुरवतील. कारण ५जी उपकरणे आता परवडणारी होत आहेत. यामुळे लोक आपली उपकरणे अद्ययावत करतील.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त