राष्ट्रीय

२२ भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेकडून सुटका

नवशक्ती Web Desk

रामेश्वरम : श्रीलंकेच्या नौदलाने पकडलेल्या तामिळनाडूमधील २२ मच्छिमारांना रविवारी सोडण्यात आले. सुटकेनंतर ते बोटीतून पंपानमध्ये परत आले.
तामिळनाडूतील २२ मच्छिमार दोन बोटींमधून शनिवारी भारत-श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात मासेमारी करत होते. खराब हवामानामुळे ते आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत थांबले होते. तेथे मासेमारी करत असल्याच्या आरोपावरून त्यांना श्रीलंकेच्या नौदलाने शनिवारी ताब्यात घेतले आणि चौकशी केली. शनिवारी रात्री मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि प्रतिकूल हवामानामुळे आंतरराष्ट्रीय पाण्यात भरकटलेल्या या मच्छिमारांची सुटका करण्याची विनंती केली. अर्थमंत्र्यांनी परराष्ट्र सचिव आणि श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर मच्छिमारांची सुटका करण्यात आली. मच्छीमार भारतात परतल्यानंतर मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने सीतारामन यांच्या मध्यस्थीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सीतारामन यांनी मच्छिमारांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच तामिळींच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस