राष्ट्रीय

राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या वितरकाची २.६ कोटींची देणगी

या चित्रपटाची ५३,२८,२११ तिकिटे विकली गेली.

Swapnil S

हैदराबाद : ‘हनुमान’ चित्रपटाच्या वितरकाने राम मंदिरासाठी २.६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यासाठी हनुमान चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये मंदिरासाठी बाजूला ठेवण्यात आले. या चित्रपटाची ५३,२८,२११ तिकिटे विकली गेली. प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये गोळा केले. त्यातून २ कोटी ६६ लाख ४१ हजार ०५५ रुपये जमा झाले. ५३ लाख जणांनी चित्रपट पाहून राम मंदिराला मदत केली. मिराज सिनेमा या भारतातील चित्रपटाच्या मोठ्या साखळी समूहाने २२ जानेवारी रोजी हनुमानाच्या ‘एका तिकिटावर एक तिकीट मोफत’ देण्याची घोषणा केली.

CJP Protest Delhi : कोंडी फुटली, चर्चा सुरू

पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; प्राप्तिकर विभागाकडून यादी न मिळाल्याने विलंब

Mumbai : तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

संतांचे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल; ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका बंधू भेटीचा अपूर्व सोहळा

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला : गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण