राष्ट्रीय

गुजरातमध्ये दोन वर्षात ३९७ सिंहांचा मृत्यू

आशियाई सिंहाच्या संवर्धनासाठी वन्यजीव एकात्मिक विकास योजनेला केंद्राकडून मदत दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २०१९ व २०२१ मध्ये ३९७ सिंहाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली.

राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ३९७ सिंहांपैकी १८२ हे सिंहाचे छावे होते. त्यांचे वय ०-१ वर्षांदरम्यान होते. २०१९ मध्ये ६६ सिंह, ६० छावे तर २०२० मध्ये ७३ सिंह तर २०२१ मध्ये ७६ सिंह तर ४६ छावे होते. मृत पावलेल्या १०.५३ टक्के सिंह व ३.८२ टक्के छाव्यांच्या मृत्यूचे कारण हे अनैसर्गिक होते, असे ते म्हणाले. आशियाई सिंहाच्या संवर्धनासाठी वन्यजीव एकात्मिक विकास योजनेला केंद्राकडून मदत दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर; ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर

अमेरिकेच्या भारत-चीन अहवालावर चीनचा आक्षेप

ओदिशातील गुम्मा जंगलात कुख्यात माओवादी गणेश उईकेसह ५ जणांचा खात्मा

नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरले

पुण्यात दादा विरुद्ध अण्णा संघर्ष पेटणार