राष्ट्रीय

मौनी अमावस्येला प्रयागराजमध्ये ९० लाख भाविकांचे स्नान

या संबंधात माघ मेळा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यभरातून लोक घाटांवर येत आहेत.

Swapnil S

प्रयागराज : संगमाच्या या शहरात माघ मेळ्यातील तिसरा प्रमुख स्नान सोहळा मौनी अमावस्येला शुक्रवारी झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे ९० लाख लोकांनी गंगा आणि पवित्र संगममध्ये स्नान केले, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.

या संबंधात माघ मेळा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यभरातून लोक घाटांवर येत आहेत. ते म्हणाले की, प्रचंड गर्दी पाहता घाटांची लांबी ६,८०० फुटांवरून ८,००० फूट करण्यात आली असून एकूण १२ घाट तयार करण्यात आले असून, कपडे बदलण्यासाठी शेड बांधण्यात आल्या आहेत. प्रशासनाने १२ हजार संस्थात्मक शौचालयांव्यतिरिक्त सार्वजनिक शौचालयांची संख्या १८०० वरून सहा हजार केली आहे. मेळा परिसरात एकूण शौचालयांची संख्या आता १८ हजार झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक अनिल कुमार म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात पुरेशा प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती