राष्ट्रीय

संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा

Swapnil S

गांधीनगर : वकिलाला अडकवण्यासाठी अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी गुजरात येथील सत्र न्यायालयाने गुजरातमधील माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. ठक्कर यांनी भट्ट यांना राजस्थानातील वकिलाला खोट्या गुन्ह्यात संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा अडकवल्याप्रकरणी दोषी ठरवले.

न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना १९९६ च्या खटल्यात दोषी ठरवले. यापूर्वी २०१९ मध्ये जामनगर कोर्टाने त्यांना कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी ठरवले होते.

भट्ट यांना २०१५ मध्ये भारतीय पोलीस सेवेतून बडतर्फ केले, तेव्हा ते बनासकांठा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. जिल्हा पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंग राजपुरोहित यांना १९९६ मध्ये अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक केली होती.

वकील राजपुरोहित राहत असलेल्या पालनपूर येथील हॉटेलच्या खोलीतून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा जिल्हा पोलिसांनी केला होता.

भट्ट यांच्या पत्नी श्वेता यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राजस्थान पोलिसांनी मात्र नंतर सांगितले की, बनासकांठा पोलिसांनी राजपुरोहितला राजस्थानातील पाली येथील वादग्रस्त संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणण्यासाठी खोटे ठरवले होते.

माजी पोलीस निरीक्षक आय. बी. व्यास यांनी १९९९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती केली होती. भट्ट यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सप्टेंबर २०१८ च्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि तेव्हापासून ते पालनपूर तुरुंगात आहेत.

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

"काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं, पण प्रत्येकवेळी तो फेल गेला..."फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान