जयपूरमध्ये दीपकेंना मारहाण; हल्ला करणाऱ्यांना दीपकेंच्या समर्थकांकडून बेदम चोप 
राष्ट्रीय

जयपूरमध्ये दीपकेंना मारहाण; हल्ला करणाऱ्यांना दीपकेंच्या समर्थकांकडून बेदम चोप

नीट फेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी याबाबतच्या समस्यांविरोधात आंदोलन पुकारणारे कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर सोमवारी जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान दोन तरुणांनी हल्ला करीत दीपके यांच्या श्रीमुखात भडकावण्याची घटना घडली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Swapnil S

जयपूर : नीट फेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी याबाबतच्या समस्यांविरोधात आंदोलन पुकारणारे कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर सोमवारी जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान दोन तरुणांनी हल्ला करीत दीपके यांच्या श्रीमुखात भडकावण्याची घटना घडली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अभिजीत नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान, घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले. यानंतर, व्यासपीठावरून आपले मोबाईल फोन आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

जिहादी मानसिकता

आंदोलनात सहभागी झालेले तरुण 'मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो' आणि 'पेपरफुटी थांबवा' यांसारख्या घोषणा असलेले फलक आणि तिरंगा घेऊन आले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसोबत आंदोलनात सामील झाल्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कॉकरोच चित्र काढले आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या! अशी घोषणा लिहिली. ज्या तरुणाने दिपके यांना थप्पड मारली तो म्हणाला, हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. मी जयपूरचा आहे. मी एक राष्ट्रवादी आहे. हा अभिजीत दिपके विनाकारण देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.

कानशिलात मारणाऱा ताब्यात

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली. दिपके यांना खांद्यावर उचलून आत नेले जात होते. यावेळी जमावातील दोन तरुणांनी त्यांना थप्पड मारली. सीजेपीच्या सदस्यांनीही त्या तरुणांना चोप दिला. कानशिलात मारणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.

दिल्ली चलो घोषणा

कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित केले. त्यांनी घोषणा दिली, हिंदू-मुस्लिम राजकारण चालणार नाही, चालणार नाही. आपण हे स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळवले आहे. आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेले आहोत. आपण जात आणि धर्माने विभागलेले आहोत, पण आपण यात अडकून पडता कामा नये. आम्ही २० जून रोजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढू. यावेळी, जेव्हा आम्ही दिल्लीला जाऊ, तेव्हा राजीनामा घेतल्याशिवाय परत येणार नाही. त्यांनी "दिल्ली चलो!" अशी घोषणाही दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी

तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी

Thane : दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत गोमातेसाठी ११ किलो चारा! QR कोडद्वारे चारा वितरणाची माहिती आणि छायाचित्रे मिळणार