राष्ट्रीय

कर्नाटकात हवाई दलाच्या विमानाचा अपघात; प्रसंगावधान दाखवल्याने वैमानिक सुरक्षित

विमान जमिनीवर कोसळण्यापुर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

नवशक्ती Web Desk

कर्नाटकात हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळल्याची घटना घडली आहे. चामराजनगर जिल्ह्यातील बोगापुरा गावाजवळ हे विमान कोसळलं आहे. नियमीत उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान बोगापुरा गावातील एका शेतात कोसळलं. जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला. यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटातच आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. विमान जमिनीवर कोसळण्यापुर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, आज दुपारच्या सुमारास हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळलं. या विमानात दोन वैमानिक होते. त्यापैकी एक महिला वैमानिक होती. या घटनेचं कारण अद्याप कळू शकले नाही. वरिष्ठांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने देखील याबाबत ट्विट केलं आहे. भारतीय हवाई दलाचं किरण ट्रेनर विमान हे आज कर्नाटकातील चामराजनगरमध्ये कोसळलं आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. विमान कोसळण्यपूर्वी ते दोन्ही बाहेर पडले होते. या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात शेतात पडलेल्या विमानाभोवती परिसरातील अनेक शेतकरी आणि गावकरी जमा झाले होते.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट