राष्ट्रीय

विमान अपघातातून वाचला, पण भीतीने आयुष्यच हिरावलं; विश्वास कुमारचे मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू

अहमदाबादहून लंडन गॅटविक्सला जाणारे विमान १२ जून रोजी उड्डाण घेताच काही सेकंदांत कोसळले. या भीषण दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, या भयानक दुर्घटनेत केवळ ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश जीवंत परतला. तो अजूनही या अपघातातून सावरू शकलेला नाही. त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

नेहा जाधव - तांबे

अहमदाबादहून लंडन गॅटविक्सला जाणारे विमान १२ जून रोजी उड्डाण घेताच काही सेकंदांत कोसळले. या भीषण दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, या भयानक दुर्घटनेत केवळ ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश जीवंत परतला. मात्र, त्याचे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तो अजूनही या अपघातातून सावरू शकलेला नाही. त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

सख्ख्या भावाचा मृत्यू -

या अपघातात विश्वासने त्याचा सख्खा भाऊ अजय कुमार रमेश यालाही गमावले. अजयचा मृतदेह १७ जून रोजी डीएनए तपासणीनंतर कुटुंबाला सुपूर्त करण्यात आला. त्याच दिवशी विश्वासला अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. १८ जून रोजी दीव येथे त्याने स्वतःच्या भावाचे अंत्यसंस्कार पार पाडले.

या साऱ्या घटनांमुळे विश्वासची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. त्याचा चुलत भाऊ सनी याने सांगितले, त्या दुर्घटनेचं दृश्य, ढिगाऱ्यातून वाचण्याचा क्षण, डोळ्यांसमोर जळत असलेले मृतदेह आणि भावाचा मृत्यू या सगळ्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. विश्वास अजून कोणाशी बोलत नाही. शांतच असतो. तो मध्यरात्री दचकून उठतो आणि पुन्हा झोपू शकत नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लंडनला परतीचा निर्णयही नाही -

विश्वास आणि अजय हे दोघेही गुजरातमधील दीवमध्ये आपल्या कुटुंबाला भेटून परत लंडनला जात होते. त्यावेळेस हा अपघात घडला. पण, आता विश्वासने अद्याप लंडनला परतण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या त्याचं संपूर्ण लक्ष उपचारांवर आहे, असे सनीने स्पष्ट केले.

जीव वाचला, पण...

आज विश्वास कुमार रमेश जीवंत असला तरी त्याचं मन अजूनही त्या आगीच्या, धुराच्या आणि मृत्यूच्या क्षणांमध्ये अडकलेलं आहे. ढिगाऱ्यांतून बाहेर पडणं त्याच्यासाठी शक्य झालं, पण त्या आठवणींमधून बाहेर पडणं त्याच्यासाठी आजही अत्यंत कठीण ठरत आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत