प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; १६१ प्रवासी असलेला विमान तातडीने उतरविले

एअर इंडियाच्या दिल्ली- इंदूर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने हे विमान शुक्रवारी इंदूर विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने एटीसीला कळवले आणि विमान तातडीने उतरविण्यात आले. विमानात १६१ प्रवासी होते.

Swapnil S

इंदूर : एअर इंडियाच्या दिल्ली- इंदूर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने हे विमान शुक्रवारी इंदूर विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने एटीसीला कळवले आणि विमान तातडीने उतरविण्यात आले. विमानात १६१ प्रवासी होते.

दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट क्रमांक आयएक्स-१०२८ च्या वैमानिकाला लँडिंगपूर्वी इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी सकाळी विमानाचे इंदूर विमानतळावर आपत्कालीन लैंडिंग करावे लागले. एटीसी कंट्रोलकडून माहिती मिळताच विमानतळावर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सीआयएसएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. सकाळी ९.५४ वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सध्या तांत्रिक पथक विमानातील बिघाडाची चौकशी करत आहे. त्यानंतर विमान परत दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

सध्या सदर विमान प्रवाशांना इंदूरहून दिल्लीला परत घेऊन जात होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान विमानतळावरच पार्क करण्यात आले आहे. सकाळी १०.०५ वाजता इंदूरहून दिल्लीला जाणारे परतीचे विमान क्रमांक आयएक्स-१०२९ रद्द करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला