राष्ट्रीय

ज्ञानवापी प्रकरणाबाबत मोठी बातमी ; हिंदू गटाची 'ही' याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

ज्ञानवापी परिसरातील वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदीर होतं. ज्या ठिकाणी भगवान शंकरानं स्वत: ज्योतिर्लिंगाची स्थापना केली असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता

नवशक्ती Web Desk

ज्ञानवापी परिसरात बिगर हिंदुंना प्रवेश बंदी करण्यात यावी यासाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आली आहे. राखी सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यामूर्ती प्रितींकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

श्रुंगार गौरी प्रकरणात जोपर्यंत वाराणसी जिल्हा कोर्टाचा निर्णय येत नाही. तोपर्यंत ज्ञानवापी परिसरात बिगरहिंदूंना प्रवेशबंदी करण्यात यावी आणि ज्ञानवापी पुरिसारत मिळालेल्या हिंदू प्रतिकांना संरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तसंच श्री आदि विश्वेश्वर मंदिराच्या (सध्याचं ज्ञानवापी परिसर) प्राचिन अवशेषांना वाचवायचं आहे. तसंच यात असाही दावा करण्यात आला आहे की, ज्ञानवापी परिसरातील वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदीर होतं. ज्या ठिकाणी भगवान शंकरानं स्वत: ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती.

ज्ञानवापीच्या जागी असलेलं मंदीर औरंगजेबानं नष्ट केलं होतं ?

ज्ञानवापी मशिदीबाबत असं सांगितलं जात की, ज्ञानवापी परिसरातील वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदीर होतं. या मंदिरात स्वत: भगवान शंकराने ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. हे मंदीर १६६९ मध्ये मुस्लिम शासक औरंगजेबनं उद्धवस्थ केलं होतं. यानंतर या मंदीराच्या जागेवर अनधिकृतरित्या एक नव बांधकाम केलं गेलं. जी आज ज्ञानवापी मशीद म्हणून ओळखली जाते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली