PM
राष्ट्रीय

मथुरेतील इदगाह परिसराचेही सर्वेक्षण ;अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी  

Swapnil S

प्रयागराज : मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारच्या शाही ईदगाह परिसराचे सर्वेक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यास गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी वकील आयुक्ताची नियुक्ती करण्यास सहमती दर्शविली. तेथे एकेकाळी हिंदू मंदिर होते, असे सूचित करणारी चिन्हे तेथे आहेत, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. या संबंधात १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी सर्वेक्षणाच्या पद्धतींवर चर्चा केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.

कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मुद्द्यावरील आदेश हा दुसरा मंदिर-मशीद वाद आहे. ज्यात उच्च न्यायालयाने गेल्या काही महिन्यांत एका सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) अलीकडेच वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण केले, परंतु अहवाल सादर करण्यासाठी स्थानिक न्यायालयाकडे अधिक वेळ मागितला आहे.

अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे की, मशिदीच्या आवारात हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य असलेले कमळाच्या आकाराचे स्तंभ अस्तित्वात आहेत आणि हिंदू देवता 'शेषनाग'ची प्रतिमा देखील तेथे आहे. स्तंभाच्या पायथ्याशी हिंदू धार्मिक चिन्हे आणि कोरीव काम दिसत असल्याचेही सादर करण्यात आले. मे महिन्यात उच्च न्यायालयाने मथुरा वादाशी संबंधित सर्व खटले स्वतःकडे वर्ग केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त