राष्ट्रीय

अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर

वृत्तसंस्था

‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आले होते. एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, असेही कोर्टाने झुबेर यांना सांगितले आहे.

चार वर्षांपूर्वी ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे तसेच द्वेषाला उत्तेजन या आरोपांखाली झुबेर यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आले होते. त्यानंतर ११ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याआधीच झुबेर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. फिर्यादी पक्षाने झुबेर यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच लोकांना भडकावणारे ट्वीट केल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करु नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण