फोटो : एक्स
राष्ट्रीय

Amazon Smbhav Summit 2025 : ॲमेझॉन भारतात ३.१४ लाख कोटींची गुंतवणूक करणार

मायक्रोसॉफ्टपाठोपाठ आता ॲमेझॉननेही भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर म्हणजेच ३.१४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीवर केंद्रित असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टपाठोपाठ आता ॲमेझॉननेही भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर म्हणजेच ३.१४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीवर केंद्रित असेल.

ही घोषणा ॲमेझॉनच्या वार्षिक एसएमबीएपएव्ही समिटमध्ये झाली, जिथे कंपनीने लहान व्यवसाय आणि एमएसएमईएसना एआय टूल्स देण्याची योजना सांगितली. २०१३ पासून आतापर्यंत ॲमेझॉनने भारतात एकूण ४० अब्ज डॉलर म्हणजेच ३.५९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यात कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित

ॲमेझॉनची ही नवीन गुंतवणूक तीन मुख्य क्षेत्रांमध्ये म्हणजे एआयद्वारे डिजिटल परिवर्तनाला गती देणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे जेणेकरून 'मेड-इन-इंडिया' उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचतील आणि रोजगार निर्मितीद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणे यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

"महाराष्ट्रात लहान मुलं-तरुणी पळवल्या जातायत..."; राज ठाकरेंची गंभीर चिंता, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ठोस कारवाईची मागणी

मुंबईकरांना मोठा दिलासा; २० हजार इमारतींना OC मिळण्याचा मार्ग मोकळा, सुधारित अभय योजनेची अंमलबजावणी सुरू

परदेशी पर्यटकांसाठी महाअतिथी पोर्टल; घरबसल्या बुकिंग, पर्यटनस्थळी सोयीसुविधा; पर्यटन विभागाचा पुढाकार

केवळ तीन दिवसांत चोरीचा छडा; मध्य रेल्वेच्या RPF ची उत्कृष्ट कामगिरी

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला नाममात्र दरात जागा; अवघ्या १ रुपयांत ३० वर्षांचे भाडेपट्टा नूतनीकरण