राष्ट्रीय

कर्करोगावरील उपचारात एम्सचे महत्त्वाचे संशोधन; ‘थेरॅनोस्टिक्स’ उपचार पद्धतीने रुग्णाचे आयुष्य वाढवण्यास मदत

Swapnil S

नवी दिल्ली : जगभरात कर्करोगावरील उपचारांसाठी संशोधन सुरू आहे. कर्करोगावरील उपचारांत भारतासाठी एक आशेचा किरण मिळाला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात १५ वर्षांपासून कर्करोग उपचारावर संशोधन सुरू आहे. येथे कर्करोगावरील ‘थेरॅनोस्टिक्स’ नावाच्या उपचार पद्धतीद्वारे कर्करोगाच्या गाठी ओळखण्यासाठी किरणोत्सर्गी औषधाचा वापर केला जातो. याचा वापर ट्यूमरच्या उपचारादरम्यान आणि इतर उपचार पद्धतीत प्रभावी वापर केला जाऊ शकतो, असे एम्सच्या संशोधकांनी म्हटले आहे. या नवीन उपचार पद्धतीमुळे कर्करोगाच्या रुग्णांचे वय वाढण्यात मदत झाली आहे. दोन वर्षांत कर्करोग रुग्णांच्या आयुष्यमानात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील न्यूक्लियर मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सी. एस. बल यांनी सांगितले की, ‘थेरॅनोस्टिक्स’ उपचारात रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठींना शोधून काढून टाकल्या जातील. तसे करताना रुग्णाच्या शरीरातील निरोगी पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. या उपचारामधील रेडिएशनची पद्धत वेगळी आहे. ज्या रुग्णांना पारंपरिक कर्करोग उपचार यशस्वी होण्याची शक्यता असते, अशा रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरली जाते.

टेस्टोस्टेरॉनची पातळी कॅस्ट्रेशन पातळीच्या वर चढते, तेव्हा ही थेरपी कॅस्ट्रेशन-इम्यून प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करते. त्या उपचार पद्धतीचे सकारात्मक परिणाम रेडिओआयोडीन-रिफ्रॅक्टरी थायरॉईड कर्करोग, न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर, स्तनाचा कर्करोग आणि मेड्युलरी थायरॉईड कर्करोगात देखील दिसून येत आहेत.

थेरनोस्टिक्स पद्धतीचा उपयोग

थेरनोस्टिक्स हा शब्द निरीक्षण आणि उपचारांवरून आला आहे. हे रेडिओन्यूक्लाइड्स किंवा रेडिओआयसोटोपसह लेबल केलेल्या रेणूंच्या संकल्पनेशी संबंधित आहे. यामध्ये रेडिएशन आणि केमोथेरपीचे निवडक गुणधर्म एकत्रित करण्यात आले आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी यांसारख्या दीर्घकालीन कर्करोगावरील उपचारांची ही पहिली पद्धत आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!