संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

विक्रमवीर गृहमंत्री अमित शहा २२५८ दिवस पदावर विराजमान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विक्रम नोंदवला. भारताच्या इतिहासात २२५८ दिवस गृहमंत्री राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विक्रम नोंदवला. भारताच्या इतिहासात २२५८ दिवस गृहमंत्री राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

३० मे २०१९ मध्ये ते पहिल्यांदा गृहमंत्री बनले. ९ जून २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. १० जून २०२४ रोजी ते पुन्हा गृहमंत्री बनले. त्यानंतर ते आतापर्यंत गृहमंत्री आहेत.

गृह खात्यासोबतच ते देशाचे पहिले सहकार मंत्री आहेत. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गुजरातचे गृहमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत त्यांनी जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपला.

अडवाणींचा विक्रम मोडला

गृहमंत्री म्हणून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विक्रम शहा यांनी तोडला आहे. अडवाणी हे २२५६ दिवस देशाचे गृहमंत्री होते. अडवाणी यांच्यापूर्वी काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वात जास्त गृहमंत्री होते.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव