AI कंपन्या आयुष्याशी खेळत आहेत...; बेजबाबदार एआय वापराचे कारण देत अँथ्रॉपिक संशोधकाचा राजीनामा 
राष्ट्रीय

AI कंपन्या आयुष्याशी खेळत आहेत...; बेजबाबदार एआय वापराचे कारण देत अँथ्रॉपिक संशोधकाचा राजीनामा

अँथ्रॉपिक या एआय संस्थेतील संशोधक जॅकब कॉक्सन यांनी बुधवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. सुपरइंटेलीजन्स (महाबुद्धिमत्ता) विकसित करण्याच्या अनियंत्रित शर्यतीत ओपनएआयसह प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या बेजबाबदारपणे वागत असून "आपल्या आयुष्याशी खेळत आहेत", असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अँथ्रॉपिक या एआय संस्थेतील संशोधक जॅकब कॉक्सन यांनी बुधवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. सुपरइंटेलीजन्स (महाबुद्धिमत्ता) विकसित करण्याच्या अनियंत्रित शर्यतीत ओपनएआयसह प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या बेजबाबदारपणे वागत असून "आपल्या आयुष्याशी खेळत आहेत", असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मागील तीन वर्षे ओपनएआय आणि अँथ्रॉपिक या दोन्ही संस्थांमध्ये प्री-ट्रेनिंग संशोधक म्हणून काम केलेल्या कॉक्सन यांनी सांगितले की, विविध प्रयोगशाळांमधील ही तीव्र स्पर्धा योग्य सुरक्षा उपायांशिवाय सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी इशारा दिला की, हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने अतिमानवी प्रणालींच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्या काहीही हॅक करू शकतात, एका रात्रीत कोणत्याही क्षेत्रात क्रांती आणू शकतात आणि वास्तविक सत्ता व संसाधने हस्तगत करू शकतात. मानवाच्या इतर कोणत्याही उपक्रमात एवढा मोठा धोका निर्माण झालेला नाही, असेही ते म्हणाले.

सहकाऱ्यांना आणि इतर संशोधकांना आवाहन

तुम्ही एखाद्या प्रयोगशाळेत संशोधक असाल तर येणारे काही वर्षे नेमके कसे असतील याचा विचार करण्याचे मी तुम्हाला आवाहन करतो. एखाद्या महाबुद्धिमत्ता असलेल्या आरएल रनची मानसिक स्थिती पूर्णपणे समजून न घेता, तुम्ही त्याची सुरुवात करू इच्छिता का? 'हे कसलेही झाले तरी घडणारच आहे' म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष करणार, की वेगळ्या आणि सुरक्षित परिस्थितीची मागणी करण्यासाठी या क्षणाचा वापर करणार?

खासगी चिंता आणि सुरक्षेचे उल्लंघन

एआय क्षेत्रात काम करणारे अनेक लोक हे मानतात की, या दशकाच्या अखेरपर्यंत एआय मुळे अत्यंत विनाशकारी हानी होऊ शकते.

अधिकारी आणि संशोधक सार्वजनिकरीत्या संयमित भाषा वापरत असले, तरी अनेक जण वैयक्तिक पातळीवर अनियंत्रित एआयच्या अस्तित्वावरील धोक्यांबद्दल प्रचंड चिंतित आहेत.

राजीनाम्याची घोषणा आणि थेट आरोप

अँथ्रॉपिकमधील माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी गेल्या तीन वर्षांत ओपनएआय आणि अँथ्रॉपिक दोन्ही ठिकाणी प्री-ट्रेनिंग संशोधनाचे काम केले आहे. दोन्हीपैकी कोणतीही कंपनी जबाबदारीने वागत नाहीये. त्या थेट स्वयं-सुधारणा करणाऱ्या महाबुद्धिमत्तेच्या शर्यतीत धावत असून आपल्या आयुष्याशी जुगार खेळत आहेत.
जॅकब कॉक्सन

दोन कंपन्यांमधील फरक आणि मानसिकता

ओपनएआयमध्ये अनेकांनी याच्याशी जोडलेले मानवी संस्कृतीवरील धोके गांभीर्याने समजून घेतलेले नाहीत. अँथ्रॉपिकमध्ये हे धोके चांगले ठाऊक आहेत, परंतु ते आधी पोहोचण्याच्या शर्यतीत अडकले आहेत – कोणीही इतर जबाबदारीने वागणार नाही, त्यामुळे आपणच हे आधी केले पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे. हा धोका स्वीकारणे आणि या शर्यतीचा शेवटचा टप्पा सुरू करणे हा एक अहंकारपूर्ण जुगार आहे, जो एखाद्या खासगी कंपनीच्या स्लॅक चॅटवरून सुरू केला जाऊ नये.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत

पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री

Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका