अशोक मित्तल ANI
राष्ट्रीय

आप खासदार अशोक मित्तल यांच्यावर ईडीचे छापे; मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपवर निशाणा, तर भाजपकडून प्रत्युत्तर

आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यावसायिक ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. या कारवाईचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, भाजपने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीची "तयारी" सुरू केल्याचा आरोप केला आहे.

Swapnil S

चंडीगड : आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यावसायिक ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. या कारवाईचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, भाजपने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीची "तयारी" सुरू केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पंजाब भाजप नेत्यांनी मान यांच्यावर पलटवार करत 'आप' हा "चोरांचा आणि लुटारूंचा" पक्ष असल्याचे म्हटले आहे.

अशोक मित्तल यांच्या पंजाब आणि हरियाणातील व्यावसायिक आणि निवासी ठिकाणांवर 'परकीय चलन व्यवस्थापन कायद्या'च्या (फेमा) कथित उल्लंघनाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. मित्तल हे जालंधरमधील 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे कुलपती असून, अलीकडेच त्यांची राज्यसभेत 'आप'चे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मान यांच्यावर टीका करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेअंतर्गत भ्रष्टाचाराची घाण साफ केली जाईल. तुमचा पक्ष चोरांचा असून तुमचे खासदार-मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत.

पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनीही मान यांना सुनावले. "स्वतःचे दही कोण आंबट म्हणते का, तुमच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे कारनामे दररोज समोर येत आहेत. जर तुमचे सरकार कारवाई करणार नसेल, तर केंद्र सरकारला भ्रष्टाचाराविरोधात पाऊल उचलावेच लागेल, असे जाखड म्हणाले.

'आप'चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबच्या अनेक मंत्र्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्सवर लिहिले की, भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मित्तल यांच्या घरावर आणि विद्यापीठावर ईडीचे छापे पडणे, ही मोदींची जुनीच पद्धत आहे. आम्ही फांदीवरून गळून पडणारी पाने नाही, वादळांनी आपल्या मर्यादेत राहावे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके