इम्फाळ : दहशतवादविरोधी कारवायांसाठी आसाम रायफल्सच्या दोन बटालियन मणिपूरमधून जम्मू-काश्मीर येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीआरपीएफच्या या १५०० सैनिक असलेल्या दोन तुकड्या मणिपूर येथे तैनात होत्या, असे सूत्रांनी सांगितले. मणिपूरमध्ये तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या उर्वरित बटालियन्स बंडखोरीविरोधी आणि सीमा रक्षणाच्या दुहेरी भूमिकेसाठी कार्यरत राहतील, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित होते.