राष्ट्रीय

सहाय्यक शिक्षक निवड यादी: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

उत्तर प्रदेशातील ६९ हजार सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी नवी निवड यादी तयार करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते, त्याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ६९ हजार सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी नवी निवड यादी तयार करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते, त्याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

राज्य सरकारने जून २०२० आणि जानेवारी २०२२ मध्ये सहा हजार ८०० उमेदवारांचा समावेश असलेली सहाय्यक शिक्षकांची निवड यादी जाहीर केली होती ती रद्दबातल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत अंतिम सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सुनावणीची तारीख जाहीर केली जाईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान