Photo : X
राष्ट्रीय

अयोध्येतील राम मंदिरात नमाज पढण्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकांनी घेतले ताब्यात

अयोध्या येथील राम मंदिर परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काश्मिरी व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

अयोध्या : येथील राम मंदिर परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काश्मिरी व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे.

सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, पकडण्यात आलेली व्यक्ती राम मंदिर परिसरात नमाज पढण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना मंदिराच्या दक्षिण भागात घडली. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी संबंधित व्यक्तीला नमाज पढण्यापासून रोखले. त्यानंतर त्याने विशिष्ट समुदायाची घोषणाबाजी केली.

या घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा, पोलीस व वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केली. पकडलेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल अहद शेख असे आहे. तो जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील आहे. मंदिरात दर्शन केल्यानंतर सीता रसोई येथे नमाज पढण्याचा प्रयत्न करत होता.

ही व्यक्ती अयोध्येत का आली? कोणाच्या सांगण्यावरून आली, मंदिर परिसरात तो का गेला? नमाज पढण्यामागे त्याचा उद्देश काय होता? याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. अयोध्या पोलीस व गुप्तचर यंत्रणांनी याबाबत काश्मीरमध्येही चौकशी सुरू केली. शोपिया येथील या व्यक्तीच्या घरी सुरक्षा यंत्रणा पोहचली आहे. तेथे त्याच्या मुलाने सांगितले की, वडील चार ते पाच दिवसांपूर्वीच घरातून निघाले आहेत. ते अयोध्येला पोहचले याची काहीच माहिती नाही.

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार